Thursday, March 20, 2014

27/09/2013



मला भेटायास आले  निसर्ग 
एका पठारावर त्याने थाटले स्वर्ग 
कधी विचार केला होता, असं काही पाहेल ?
कि त्या फुलांचा गालिच्यावर मन माझे निजेल 

छोट्या छोट्या फुलांनी 
भरला होता गच्च तो पठार 
आणि सैरा वैरा गार तोः वारा 
गरमीच्या ताब्यातून नुकताच झाला होता फरार 

इतके रम्य ते चित्र होते 
शरीरावर शहारे आणत होते 
पावसानी त्या चित्राची कायाच पालटली
चिमुकल्या फुलांवर मोती उगवून आणली 

अधून मधून उन्हांनी खेळला 
पावसासोबत लाप्पण डाव 
फुलं होती रंग बदलत 
कधी धूप कधी छाव 

धाकांची होती भूमिकाच वेगळी 
आकाशात राहुं ती होती थकली 
जमिनीस आलिंगन देण्यास ते स्वतः आले 
पाठत्वारचे एक एक फुल तेंव्हा होते लाजले. 

मला भेटायास आले निसर्ग !!!